सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार द्वारा 22 जानेवारी 2015 साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. ही केंद्र सरकारची सर्वात कमी गुंतवणुकीची विशेष करून मुलींसाठी बचत योजना आहे.
या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना, सुकन्या समृद्धि खाते किंवा Sukanya Wealth Account या नावाने देखील ओळखले जाते. या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना, सुकन्या समृद्धि खाते किंवा Sukanya Wealth Account या नावाने देखील ओळखले जाते.

प्रस्तावना:-
सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार द्वारा 22 जानेवारी 2015 साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. ही केंद्र सरकारची सर्वात कमी गुंतवणुकीची विशेष करून मुलींसाठी बचत योजना आहे.
या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना, सुकन्या समृद्धि खाते किंवा Sukanya Wealth Account या नावाने देखील ओळखले जाते. या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना, सुकन्या समृद्धि खाते किंवा Sukanya Wealth Account या नावाने देखील ओळखले जाते.
केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे सरकारी बँक व पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवी च्या खूप साऱ्या फायदेशीर योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून लाभ घेता येतो.
सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश आणि वैशिष्ट्ये:-Purpose of Sukanya Samriddhi Yojana & features of Sukanya Samriddhi Yojana
सुकन्या समृद्धी मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच जी मुलीच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देते. ही योजना केंद्र सरकारने मुलींच्या नावाने सुरू केलेली योजना आहे. मुलींना भविष्यात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने या योजनेची शुरुवात करण्यात आली आहे.
सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी मुलीचे वय २१ वर्षे होईपर्यंत निर्धारित केला गेला असला तरी सुरुवातीच्या फक्त १५ वर्षांपर्यंतच योजनेअंतर्गत पैसे जमा करायचे आहेत. मुलीचे वय 10 वर्षे पूर्ण होईपर्यंत तिच्या नावावर खाते उघडता येते.
मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते.पोस्ट ऑफिस आणि अधिकृत बँकांमध्ये खाते उघडता येते. खाते भारतात कुठेही एका पोस्ट ऑफिस/बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते.
या योजनेनुसार आई वडील आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात व उच्च शिक्षणाच्या उद्देशाने शैक्षणिक खर्च पूर्ण करण्यासाठी पैसे काढण्याची परवानगी दिली जाईल.
ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते. पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी बचत करण्यास प्रोत्साहित करते.
किमान ठेव ₹ 250/- एका आर्थिक वर्षात कमाल ठेव ₹ 1.5 लाख. सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी भरणे आवश्यक आहे तसे न केल्यास सदर खाते बंद केले जाईल व खाते पुन्हा सुरू करण्यासाठी जितकी वर्षे खाते बंद असेल त्या प्रत्येक वर्षाला ५०/- रुपये दंड आकारून खाते पुन्हा सुरू केले जाईल.
मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
मुलीचे वय १८वर्ष पूर्ण झाल्यावरच मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या आरोग्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून फक्त ५० टक्के रक्कम काढता येईल.
मुलीचे वय २१ वर्षे होऊन गेल्यावर सुद्धा जर लाभार्थी सुकन्या समृद्धी योजनेच्या बचत खात्यातून पैसे काढत नसेल तर त्या जमा रकमेवर सुद्धा व्याज दिले जाईल.
सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा 2.5 हजारांची गुंतवणूक; मुलीच्या २१ व्या वर्षी मिळवा १२.५ लाखाहून अधिक रक्कम
Sukanya Samriddhi Yojana Scheme in Post Office: जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे-Benefits of Sukanya Samriddhi
सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत कमी गुंतवणूक बचत योजना आहे. अशी योजना आहे ज्यात तुम्ही किमान ठेव ₹ 250/- एका आर्थिक वर्षात कमाल ठेव ₹ 1.5 लाख. किमान फक्त 250/- रुपये गुंतवणूक करून त्याचा चांगला परतावा मिळू शकता
अल्पबचत योजनेतील ही सर्वाधिक व्याज देणारी योजना आहे. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्या पासून फक्त १५ वर्षापर्यंत त्या खात्यात तुम्हाला पैसे भरायचे असतात पुढील १५ ते २१ वर्षापर्यंत या खात्यात पैसे भरायची गरज नसते या योजनेत ३५.२७ टक्के तुमची गुंतवणूक असते आणि ६४.७३ टक्के रक्कम व्याजाच्या स्वरूपात दिली जाते. कमी गुंतवणुकीच्या योजनांपैकी ही एकमेव.
सुकन्या समृद्धी योजनेचा सध्या व्याज दर वार्षिक ८.० टक्के आहे. योजनेचा व्याजदर पीपीएफ (PPF),एफडी (FD),एनएससी (NSC), आरडी (RD), मासिक उत्पन्न योजनेपेक्षा चांगले व्याज मिळते. विशेष बाब म्हणजे या योजनेची मॅच्युरिटी २१ वर्षे आहे.
सुकन्या समृद्धी योजना १०० टक्के सुरक्षित योजना मानली जाते. या योजनेत सरकारकडून पैशाची हमी दिली जाते. देशातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक मुलीला सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो.
सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलीचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होते. जर मुलगी 18 वर्षांची झाली आणि तिला तिच्या उच्च शिक्षणाच्या किंवा तिच्या लग्नासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही ठेव रकमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकता.
मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते.
या योजनेअंतर्गत जमा रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही. I.T.Act च्या कलम 80-C अंतर्गत ठेव वजावटीसाठी पात्र आहे.खात्यात मिळालेले व्याज आयटी कायद्याच्या कलम -10 अंतर्गत प्राप्तिकरापासून मुक्त आहे.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा एखाद्या कारणामुळे मृत्यू झाल्यास जमा रक्कम व्याजा सकट लाभार्थ्याच्या पालकांना दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून फक्त १००/- रुपये प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करून सदर मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरवला जातो ज्यामुळे पालकाचा अपघात अथवा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या वारसाला किमान ३००००/- रुपये ते ७५०००/- रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
अनाथ मुलीला दत्तक घेतल्यास देखील सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
खाते उघडण्यासाठी काय करावे लागेल
- सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करा.
- ज्या मुलीच्या नावाने खाते उघडले जाणार आहे त्या मुलीच्या जन्माचा आवश्यक आहे. मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे.
- या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदाराचे एकच खाते असेल.
- 2 पेक्षा जास्त मुलींचे खाते उघडायचे असल्यास जन्म प्रमाणपत्रासह प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे.
बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुमचे खाते उघडले जाईल.खाते उघडल्यानंतर खातेदाराला पासबुकही दिले जाते.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे-
- मुलीच्या जन्माचा दाखला
काही कागदपत्रे हे मुलीच्या आईवडिलांचे असणे आवश्यक आहे. जर मुलीचे आई-वडील नसतील तर अशा परिस्थितीत मुलीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्रे असणे आवश्यक असेल.
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशन कार्ड
- विज बिल
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट
- मुलीच्या आई-वडिलांचा फोटो रहिवासी प्रमाणपत्र
अशी कोणतीही दोन कागदपत्रे अर्ज करण्यासाठी आवश्यक.
सुकन्या समृद्धी योजनेचे तोटे-Sukanya Samriddhi Yojana Disadvantages
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा कालावधी खुप मोठा म्हणजे २१ वर्षाचा असतो.
- या योजनेअंतर्गत सध्या दिला जाणारा व्याजदर ८.० टक्के आहे त्यामुळे खुप वर्ष गुंतवणूक करून सुद्धा कमी लाभ दिला जातो जो म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मधे गुंतवणूक करून मिळणाऱ्या लाभापेक्षा पेक्षा कमी आहे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलीचे लग्न तिच्या २१ वर्षाच्या आत झाल्यास मुलीला या जोजनेचा लाभ घेता येत नाही व तीला या योजनेमधून रद्द केले जाते.
- या योजनेअंतर्गत अधिकतम गुंतवणूक १.५ लाख आहे परंतु या पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास जास्त रकमेवर व्याज दिले जात नाही.
सुकन्या समृद्धी योजनेचे जुने व्याजदर-Sukanya Samriddhi Yojana Interest Rate
सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात २०१५ साली केली गेली त्या वेळी व्याजदर ९.१ टक्के होता. वर्तमान स्तिथीमध्ये हाच व्याजदर कमी होऊन ८.० टक्के आहे म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढ-उतारावर सदर व्याजदर अवलंबून असतो.
Sukanya Samriddhi Scheme-Interest Rate since Inception
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दिला जाणारा व्याजदर:-
कालावधी | RATE OF INTEREST (%) |
03.12.2014 ते 31.03.2015 | 9.1 |
01.04.2015 ते 31.03.2016 | 9.2 |
01.04.2016 ते 30.09.2016 | 8.6 |
01.10.2016 ते 31.03.2017 | 8.5 |
01.04.2017 ते 30.06.2017 | 8.4 |
01.07.2017 ते 31.12.2017 | 8.3 |
01.01.2018 ते 30.09.2018 | 8.1 |
01.10.2018 ते 30.06.2019 | 8.5 |
01.07.2019 ते 31.03.2020 पर्यंत | 8.4 |
01.04. 2020 ते 31.03.2023 पर्यंत | 7.6 |
01.04.2023 ते 30.06.2023 पर्यंत | 8.0 |