
प्रस्तावना
महाराष्ट्राच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडली योजना जाहीर करण्यात आली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आली. मुलींच्या शिक्षणासाठी लेक लाडकी योजना जाहीर करण्यात आली आहे.
‘लेक लाडकी’ योजनेचा उद्देश आणि वैशिष्ट्ये:-
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ नवीन योजना सुरू
‘लेक लाडकी’ या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत मिळेल.
या योजनेद्वारे मुलींचा शैक्षणिक आणि सामाजिक दर्जा मजबूत केला जाईल.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलींना हप्त्यांमध्ये आर्थिक मदत करेल. जेणेकरून त्यांना शिक्षण मिळून चांगले जीवन जगता येईल.
जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 बद्दल सर्व महत्वाची माहिती मिळवायची असेल तर आमचा हा लेख तुम्ही जरूर वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र लेक लाडकी योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती या लेखात अगदी सोप्या शब्दात सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही सहजपणे या योजनेचा लाभ घेऊ शकाल.
महाराष्ट्र लेक लाडकी योजना २०२३ (Maharashtra Lek Ladki Scheme 2023)
‘लेक लाडकी’ योजनेचे फायदे :-
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेंतर्गत राज्यातील मुलींना खालील फायदे दिले जातील:-
-
मुलीच्या जन्मानंतर तिच्या खात्यावर पैसे जमा होणार
-
मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील
-
चौथीत असताना ४०००
-
सहावीत असताना ६००० आणि
-
मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील.
-
लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील
महाराष्ट्र शासनाच्या लेच लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष :-
-
केवळ महाराष्ट्र राज्यातील मूळ कुटुंबेच पात्र असतील.
-
राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांकडे ही शिधापत्रिका आहेत त्यांना सरकारच्या वतीने 2023-24 या आर्थिक वर्षापासून या योजनेचा लाभ मिळणार आहे.
-
त्याचबरोबर योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
-
मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे :-
योजनेंतर्गत नोंदणीच्या वेळी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे:-
-
पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका असणे आवश्यक
-
केवळ महाराष्ट्र राज्यातील मूळ कुटुंबेच पात्र
-
मुलीच्या पालकांचे बँक खाते असणे आवश्यक
-
आधार कार्ड
-
राहिवासी दाखला
-
आधार कार्ड
-
उत्पनाचा दाखला
-
पासपोर्ट साइज फोटो