



प्रस्तावना :-
राज्यातील दारिद्र्यरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2 जुलै 2012 रोजी राज्यातील 8 जिल्ह्यांत ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली होती. त्यांनतर दि.21 नोव्हेंबर 2013 पासून ही योजना महाराष्ट्रातील उर्वरीत 28 जिल्हयांमध्ये विस्तारीत करण्यात आली होती.
‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ दि.१ एप्रिल २०१७ पासून ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ (MJPJAY) या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांना होत आहे.
योजनेंतर्गत निवडक आजारांवर शासकीय व खाजगी अंगीकृत रुग्णालयांच्या जाळयामार्फत पात्र शिधापत्रिकाधारक व अन्य लाभार्थी गटांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा उद्देश आणि वैशिष्ट्ये:-
Purpose of Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana & Features of Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana
राज्यातील दारिद्र्यरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक), अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न) शिधापत्रिका कुटुंबांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ सुरू केली आहे.
MJPJAY किंवा महाराष्ट्र आरोग्य विमा योजना या नावानेही ओळखल्या जाणार्या या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना आरोग्य विमा संरक्षण प्रदान करणे आहे.
राज्यात दि.1.04.2020 पासून सुधारित एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवली जाते. भारत सरकारने सुरू केलेल्या मोठ्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) किंवा आयुष्मान भारत योजनेचा हा एक भाग आहे. ही योजना विमा आणि हमी तत्त्वावर राबविण्यात येत असून
राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार पूर्णतः मोफत उपलब्ध करवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंतचे रुपयांपर्यंतच्या उपचार आणि इतर खर्चाची सुविधा कॅशलेस पद्धतीनं उपलब्ध होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये आहे.
आता ती मर्यादा पाच लाखांवर नेली जाणार आहे.
ही योजना प्रामुख्याने महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि दारिद्र्यरेषेवरील (APL) कुटुंबांना लक्ष्य करते.
पात्र कुटुंबांना एक अद्वितीय MJPJAY हेल्थ कार्ड दिले जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कोणत्याही पॅनेल केलेल्या हॉस्पिटलला भेट देऊ शकतात आणि त्यांचे MJPJAY हेल्थ कार्ड सादर करू शकतात. त्यानंतर रुग्णालय तपशीलांची पडताळणी करेल आणि योजनेअंतर्गत कॅशलेस उपचार प्रदान करेल.
MJPJAY लाभार्थ्यांना सुलभ आणि परवडणारी व दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करेल.
योजनेच्या कार्यक्षम अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यात भर देण्यात आला आहे.
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी 34 निवडक विशेष सेवेंतर्गत 996 प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया तथा 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेऊ शकतात.
राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे.
या योजनेचा राज्यातील लक्षावधी नागरिकांनी लाभ घेतला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून संपुर्णत: निधी प्राप्त होत आहे तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता होणाऱ्या खर्चाची केंद्र व राज्य शासन यामध्ये 60:40 या प्रमाणात विभागणी करण्यात आली आहे.
युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत एकत्रित योजनेतील गट-अ लाभार्थी कुटुंबांना 996 उपचारांकरिता प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.1.5 लक्ष रकमेपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण विमा तत्त्वावर पुरविले जात आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थी-
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व अटी:-
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी केवळ महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी पात्र असतील.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी अर्जदार हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबाचे आणि त्यांचे उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असणारे या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामधील नागरिकांकडे पिवळी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न) शिधापत्रिका ज्यांच्याकडे आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
त्यासोबत राज्य आरोग्य हमी सोसायटीने निश्चित केलेल्या फोटो ओळखपत्रांपैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र याव्दारे पटविली जाते.
महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त 14 जिल्हयातील (औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा) शेतकऱ्यांची शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.
शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी
शासकीय महिला आश्रमातील महिला
शासकीय अनाथालयातील मुले
शासकीय वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक
माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषांनुसार पात्र पत्रकार व त्यांचे कुटुंब तथा कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:-
Required documents for Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana.
ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र
असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास
लाभार्थीचे आधार कार्ड
शिधापत्रिका – राशन कार्ड
मतदार कार्ड
वाहन चालक परवाना
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
जन्म प्रमाणपत्र
अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उताराही या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामी येतो.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने निर्धारित केलेली योग्य ती ओळखपत्रे ग्राह्य धरली जातात.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे फायदे
Benefits of Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana
राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार पूर्णतः मोफत उपलब्ध
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंतचे रुपयांपर्यंतच्या उपचार आणि इतर खर्चाची सुविधा कॅशलेस पद्धतीनं उपलब्ध होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत मर्यादा आता 5 लाखांवर नेली जाणार आहे.या योजनेतून आता पाच लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य खासगी दवाखान्यातील लाखोंची बिले अदा करण्यापेक्षा या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत उपचार करून घेता येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी?
- महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयांत आरोग्य मित्र असतात. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या सर्वच रुग्णालयांत हे उपलब्ध असतात.
- आरोग्यमित्र रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करतात. तसेच रुग्णालयात उपचार घेताना योग्य ती मदतही करतात.
- या योजनेसाठी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या दस्तावेजांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वार्षिक विमा संरक्षण मर्यादा :महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY):
खर्चाची मर्यादा:-
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी 34 निवडक विशेष सेवा अंतर्गत 996 प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आणि 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेऊ शकतात.
- या योजतर्गत एका पॉलिसी वर्षात लाभार्थ्यावर प्रति कुटुंब ₹1,50,000/- पर्यंत झालेल्या सर्व रुग्णालयीन खर्चाचा समावेश होतो. मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा प्रति कुटुंब प्रति *पॉलिसी वर्ष ₹ 2,50,000/- इतकी वाढविण्यात आली आहे.
- योजनेचा लाभ कुटुंबातील एकाला किंवा सर्व सदस्यांना घेता येतो म्हणजेच प्रकरण परत्वे एकूण ₹ 1.5 लक्ष किंवा ₹2.5 लक्ष खर्चाचा लाभ पॉलिसी वर्षात कुटुंबांतील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात.
अर्थसंकल्पामधून जाहीर करण्यात आलेल्या घोषणांमध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा – सामान्यांसाठी सर्वात ‘आरोग्यदायी’ राहिलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) संदर्भातील आहे. या योजनेतून आता पाच लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य खासगी दवाखान्यातील लाखोंची बिले अदा करण्यापेक्षा या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत उपचार करून घेता येणार आहे. जन आरोग्य योजनेचं विमा संरक्षण दीड लाखांहून पाच लाख रुपये करण्यात आलं आहे.
अ.क्र. विशेष सेवा प्रकार
- जळीत
- ह्दयरोग
- ह्दयरोग शस्त्रक्रिया व उपचार
- आकस्मिक सेवा
- त्वचारोग
- अंत:स्त्राव संस्थेचे विकार
- कान, नाक व घसा रोग
- सर्वसाधारण औषधशास्त्र चिकित्सा
- सर्वसाधारण शस्त्रक्रिया
- व्याधी चिकित्सा
- संर्सगजन्य आजार
- इंटरव्हेन्श्नल रेडिओलॉजी
- जठरांत्रमार्गाचे रोग
- कर्करोगावरील औषधोपचार
- नवजात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
- मुत्रपिंड विकार
- मज्जातंतूचे विकार
- मज्जातंतूच्या विकारावरील शस्त्रक्रिया
- स्त्री रोग व प्रसुती शास्त्र
- नेत्ररोग शस्त्रक्रिया
- अस्थिव्यंग शस्त्रक्रिया
- बालरोग शस्त्रक्रिया
- बालरोग कर्करोग
- प्लास्टीक सर्जरी
- आस्कमिक वैद्यकीय उपचार
- कृत्रिम अवयव उपचार
- फुफ्फुसाच्या आजारावरील उपचार
- किरणोत्सर्गाव्दारे कर्करोग चिकित्सा
- संधिवात सबंधी उपचार
- जठर व आंत्र विकाराच्या शस्त्रक्रिया
- कर्करोगाच्या शस्त्रक्रिया
- मुत्रवह संस्थेच्या विकारांवरील शस्त्रक्रिया
- मानसिक आजार
- जबडा व चेहऱ्याच्या अस्थींवरील शस्त्रक्रिया
(MJPJA) महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेची अधिकृत वेबसाइट –
https://www.jeevandayee.gov.in/Marathi_index.jsp#
https://www.jeevandayee.gov.in
विमा कंपनी:
सदर योजना दि.2.7.2012 ते दि.31.03.2020 या कालावधीमध्ये नॅशनल इन्श्युरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत होती. दि.1.04.2020 पासून एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.