MAHARASHTRA GOVERNMENT YOJANA महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनेची माहिती

महा सरकारी योजना

ST Bus Concession for Women-रा.प. बसेसमधून महिलांना प्रवास भाडे सवलत योजना (महिलांसाठी एसटी बस सवलत)

लालपरी
लालपरी

प्रस्तावना

महाराष्ट्राच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारतर्फे महिलांना प्रवासात सूट देण्यात आली आहे. या योजनेला महिला सन्मान योजनेने संबोधित केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते.
महिलांना एसटीच्या तिकीटदरात सरसकट ५० टक्के सवलत. Maharashtra ST Bus Concession for Woman

योजनेचा उद्देश आणि वैशिष्ट्ये:-

या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल.
या महिला प्रवाशांच्या तिकीट दरातील 50 टक्के शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे.
सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 टक्के सूट. आता यामध्ये साधी, मिनी बस, निमआराम म्हणजेच एशियाड गाडी, विनावातानुकुलित शयन-आसनी म्हणजे नॉन एसी स्लिपर कोच एसटी बस आणि शिवशाही, शिवनेरी, शिवाई या तिन्ही साध्या आणि एसी बसमध्ये ५० टक्के सवलत.
भविष्यात एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसकरताही ही सवलत लागू असणार. महिलांसाठी सवलत असलेल्या तिकीटाची रंगसंगती वेगळी असणार आहे.
प्रवासी भाड्यातील अपघात साहाय्यता निधी आणि एसी बससेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात येणार.

सवलतीचे नियम व अटी:-

  • राज्यातील सर्वच महिलांना मिळणार अर्ध्या तिकीटाचा लाभ.
  • या सवलतीत तुम्ही राज्यभर कुठेही फिरू शकता. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी कुठेही फिरू शकता.
  • मात्र राज्याबाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकीटाचा आहे तो दर द्यावा लागणार म्हणजे तुम्ही पुण्यपासून बेळगावला जाण्यासाठी निघालात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच ही सवलत लागू होणार. तिथून पुढे पूर्ण तिकीट आकारले जाईल.
  • आता लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे शहरी वाहतुकीस महिलांना ही सवलत मिळणार नाही म्हणजे तुम्ही बोरिवली ते ठाणे, ठाणे ते पनवेल, कल्याण ते ठाणे एसटीने प्रवास करत असाल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही.
  • महिला रिझर्वेशन करून प्रवास करायचा विचार करत असतील तर त्यांना ही सवलत लागू होणार नाही म्हणजे प्रवास करतानाच तुम्हाला लगे हात तिकीट काढून या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. यात महिलांनी पुढच्या तारखांचे आगाऊ आरक्षण केले असेल तर तुम्हाला परतावा मिळणार नाही.
नोकरदार महिलांसाठी लालपरीचा आधार.

Leave a Comment

error: Content is protected !!